एका मोठ्या भांड्यात सर्व प्रकारची पिठे, बेसन, ओवा, जिरे, हळद, तिखट, धणे-जिरे पूड आणि मीठ एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
त्यात तेल घालून मिसळा. नंतर कोमट पाणी घालत घट्ट आणि मऊसर पीठ मळा. 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
पीठाचे समान आकाराचे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा कोरड्या पिठात घोळवा.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक गोळ्याची शक्य तितकी पातळ आणि गोल पोळी लाटा, म्हणजे खाखरा अधिक कुरकुरीत होईल.
Picture Credit: Pinterest
गरम तव्यावर पोळी दोन्ही बाजूंनी हलकी भाजा. नंतर स्वच्छ कापड किंवा खाखरा प्रेसने दाबत मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
Picture Credit: Pinterest
खाकरा पूर्णपणे सोनेरी आणि खुसखुशीत झाल्यावर तव्यावरून काढा. इच्छेनुसार वरून हलके तूप किंवा तेल लावू शकता.
Picture Credit: Pinterest
खाकरा पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. गरम चहासोबत कुरकुरीत मल्टीग्रेन खाकरा सर्व्ह करा
Picture Credit: Pinterest