किसलेली काकडी हलकेच दाबून अतिरिक्त पाणी काढा. हे पाणी न फेकता पीठ मळण्यासाठी वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे, हळद, मीठ आणि तीळ एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
त्यात किसलेली काकडी, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
काकडीतील पाणी किंवा आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मऊसर आणि थालीपीठ थापता येईल असे पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
ओल्या कापडावर हाताला पाणी लावून थालीपीठ गोल आकारात थापा आणि मध्ये २-३ लहान छिद्रे करा.
Picture Credit: Pinterest
गरम तव्यावर थालीपीठ हलक्या हाताने सोडा. छिद्रांमध्ये आणि कडांना थोडे तेल घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
Picture Credit: Pinterest
गरमागरम काकडीचे थालीपीठ दही, लोणी, तूप, हिरवी चटणी किंवा लसूण चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest