खमंग आणि पौष्टिक गुजराती हांडवो घरच्या घरी कसा बनवाल?

Life style

18 february 2026

Author:  नुपूर भगत

तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ धुऊन 5-6 तास भिजत ठेवा.

तांदूळ भिजत ठेवा

Picture Credit: Pinterest

भिजवलेले मिश्रण पाणी काढून जाडसर वाटून घ्या. हे पीठ 6-8 तास झाकून ठेवा, जेणेकरून थोडे आंबेल.

मिश्रण वाटून घ्या

Picture Credit: Pinterest

तयार पिठात किसलेली दुधी भोपळा, आलं-हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, साखर आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा.

मसाले मिसळा

Picture Credit: Pinterest

 शेवटी ईनो किंवा सोडा घालून हलकेच एकजीव करा.

ईनो घाला

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मोहरी, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी पिठात मिसळा.

कढीपत्ता घाला

Picture Credit: Pinterest

 तेल लावलेल्या जाड बुडाच्या पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये मिश्रण ओता. झाकण ठेवून मंद आचेवर 20-25 मिनिटे शिजवा.

मिश्रण वाफवा 

Picture Credit: Pinterest

वरचा भाग सोनेरी आणि कुरकुरीत झाला की सुरी घालून तपासा. थंड झाल्यावर तुकडे करून चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest