एका मोठ्या भांड्यात चिरलेली मेथी, गव्हाचे पीठ, बेसन, रवा, हळद, तिखट, धने-जिरे पूड, जिरे, साखर आणि मीठ एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
त्यामध्ये आले-हिरवी मिरची पेस्ट, लिंबाचा रस आणि तेल घाला. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून घट्ट व मऊसर पीठ मळून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार पिठाचे लांबट, सिलिंडर आकाराचे रोल बनवा. सर्व रोल एकाच आकाराचे ठेवा जेणेकरून ते समान शिजतील.
Picture Credit: Pinterest
इडली कुकर किंवा स्टीमरमध्ये हे रोल 15–20 मिनिटे वाफवून घ्या. शिजल्यावर पूर्णपणे थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
थंड झाल्यावर वाफवलेले रोल अर्धा इंच जाडीचे गोल तुकडे करून घ्या.
Picture Credit: Pinterest
कढईत थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ आणि चिमूटभर हिंग घालून फोडणी तयार करा. त्यात मुठियाचे तुकडे घालून 3–4 मिनिटे परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे घालून गरमागरम मेथी मुठिया हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest