कोलकाता स्टाईल फिश फ्राय बनवण्याची सोपी  पद्धत

Life style

06 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम फिश फिलेट स्वच्छ धुऊन घ्या आणि किचन टॉवेलने कोरडे करा.

फिश धुवून घ्या

Picture Credit: Pinterest

एका बाउलमध्ये आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी पावडर आणि लाल तिखट घालून मिक्स करा.

मॅरिनेशन तयार करा

Picture Credit: Pinterest

या मसाल्यात फिश फिलेट चांगले कोट करून किमान 20–30 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवा.

 मासे मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

एका बाउलमध्ये अंडी फेटून घ्या. दुसऱ्या प्लेटमध्ये मैदा आणि तिसऱ्या प्लेटमध्ये ब्रेडक्रंब्स ठेवा.

कोटिंगची तयारी करा

Picture Credit: Pinterest

प्रथम मॅरिनेट केलेला मासा मैद्यात घोळवा, नंतर फेटलेल्या अंड्यात बुडवा आणि शेवटी ब्रेडक्रंब्समध्ये घोळवून पूर्ण कोटिंग करा.

फिशला कोटिंग लावा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर फिश दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

 फिश फ्राय करा

Picture Credit: Pinterest

गरमागरम कोलकाता स्टाईल फिश फ्राय सॅलड, कांदा आणि मोहरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest