By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 29 Jan, 2025
मॅगी हा पदार्थ तर सर्वांच्याच आवडीचा आहे, या पदार्थाची मूळ चव ही त्याच्या मसाल्यातून येत असते
हा मसाला तुम्ही घरीदेखील तयार करू शकता आणि तुमच्या रोजच्या भाज्यांमध्येही याचा वापर करू शकता
जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर इ.
आमचूर पावडर, बडीशेप, साखर, मीठ आणि कांदा पावडर, लसूण पावडर इ.
यासाठी प्रथम कढईत जिरे, धणे आणि बडीशेप मंद आचेवर भाजून घ्या
आता एका पॅनमध्ये काळी मिरी, सुकी लाल मिरची, लवंग, दालचिनी आणि वेलची छान तळून घ्या
थंड झाल्यावर भाजलेले आणि तळलेले सर्व साहित्य मिक्सरला वाटून घ्या
आता वाटलेल्या मसाल्यात हळद, तिखट, कांदा पावडर, लसूण पावडर आणि आमचूर पावडर मिक्स करा
तयार मसाला हवाबंद डब्यात साठवून ठेवा