केरळच्या पारंपरिक चवीचा मसालेदार चिकन फ्राय

Life style

12 July 2026

Author:  नुपूर भगत

चिकन स्वच्छ धुऊन त्यात हळद, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि थोडी काळी मिरी पूड घालून ३० मिनिटे मुरत ठेवा.

चिकन मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

कढईत नारळाचे तेल गरम करून त्यात कढीपत्ता घाला. नंतर कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.

कांदा परता 

Picture Credit: Pinterest

आता धणेपूड, जिरेपूड, उरलेली काळी मिरी पूड आणि गरम मसाला घालून मंद आचेवर एक मिनिट परता.

मसाले घाला 

Picture Credit: Pinterest

मुरवलेले चिकन कढईत घालून मसाल्यासोबत चांगले मिसळा. झाकण ठेवून मध्यम आचेवर १५–२० मिनिटे शिजवा.

चिकन शिजवा 

Picture Credit: Pinterest

चिकनमधील पाणी आटू लागल्यावर झाकण काढा आणि मध्यम आचेवर परतत राहा, त्यामुळे चिकनला छान भाजलेला रंग येईल.

चिकन शिजवा

Picture Credit: Pinterest

किसलेला ताजा नारळ घालून ३–४ मिनिटे परता. यामुळे चिकनला मलबार स्टाइलची खास चव आणि हलका कुरकुरीत पोत मिळतो.

किसलेला नारळ घाला

Picture Credit: Pinterest

शेवटी कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता घालून हलकेच मिसळा. गरमागरम मलबार चिकन फ्राय तयार आहे. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest