मसाला दूध कसे बनवायचे? – 

Life style

21 July 2026

Author:  नुपूर भगत

जाड बुडाच्या पातेल्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर उकळी येईपर्यंत गरम करा.

दूध गरम करा

Picture Credit: Pinterest

एका चमचाभर कोमट दुधात केशर भिजवून ५ मिनिटे ठेवा. नंतर ते उकळत्या दुधात घाला.

केशर मिसळा

Picture Credit: Pinterest

दुधात बदाम, पिस्ते, काजू आणि चारोळी घालून हलक्या हाताने ढवळा.

सुका मेवा घाला

Picture Credit: Pinterest

साखर घालून ती पूर्णपणे विरघळेपर्यंत दूध ढवळत राहा.

दूध ढवळा

Picture Credit: Pinterest

वेलची पूड आणि जायफळ पूड घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा.

मसाले मिसळा

Picture Credit: Pinterest

मध्यम ते मंद आचेवर ५-७ मिनिटे दूध उकळा, त्यामुळे मसाल्यांचा स्वाद दुधात छान उतरतो.

 दूध आटवा

Picture Credit: Pinterest

गरमागरम मसाला दूध कपात ओता. वरून थोडे बदाम, पिस्ते आणि काही केशराच्या काड्या घालून सजवा आणि लगेच सर्व्ह करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest