जाड बुडाच्या कढईत दूध घेऊन मध्यम आचेवर उकळायला ठेवा. दूध अधूनमधून ढवळत राहा, जेणेकरून ते कढईला लागू नये.
Picture Credit: Pinterest
दूध उकळल्यानंतर आच मध्यम-कमी करा आणि दूध सतत ढवळत आटवत राहा. दूध जवळपास निम्म्यापेक्षा कमी झाले की पुढील प्रक्रिया करा.
Picture Credit: Pinterest
लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून दुधात हळूहळू घाला आणि ढवळा. दूध किंचित फाटून त्यामध्ये दाणेदार पोत तयार होऊ लागेल. पूर्णपणे पनीरसारखे फाडू नका.
Picture Credit: Pinterest
आता त्यात साखर घालून सतत ढवळत राहा. मिश्रण पुन्हा घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण घट्ट होऊन कढईच्या बाजू सोडू लागल्यावर त्यात वेलची पूड आणि तूप घाला. सर्व साहित्य मिसळून आणखी काही मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
एका ताटाला तुपाचा हलका हात लावून त्यात तयार मिश्रण पसरवा. वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी काही तास फ्रिजमध्ये ठेवा.
Picture Credit: Pinterest
मिल्क केक व्यवस्थित सेट झाल्यावर सुरीने चौकोनी किंवा आवडीच्या आकाराचे तुकडे करा.
Picture Credit: Pinterest