उरलेल्या भात फेकू नका, अशी बनवा चविष्ट फोडणी

Life style

25 September 2026

Author:  नुपूर भगत

फ्रिजमध्ये ठेवलेला शिजलेला भात वापरत असल्यास तो आधी बाहेर काढून थोडा मोकळा करून घ्या. 

भात तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडल्यावर शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून हलके भाजून घ्या.

फोडणी द्या

Picture Credit: Pinterest

आता त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. कांदा मऊ होऊन हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.

कांदा आणि मिरची परता

Picture Credit: Pinterest

कांदा परतल्यानंतर त्यात हळद घाला आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. हळद जास्त वेळ भाजू नये याची काळजी घ्या.

 हळद घाला

Picture Credit: Pinterest

आता कढईत शिजलेला भात घाला. मीठ टाकून भात हलक्या हाताने फोडणीसोबत मिसळा.

भात मिसळा

Picture Credit: Pinterest

कढई झाकून मंद आचेवर २ ते ३ मिनिटे भात गरम होऊ द्या. त्यामुळे फोडणीचा स्वाद भातामध्ये चांगला मिसळेल.

भात शिजू द्या

Picture Credit: Pinterest

गॅस बंद केल्यानंतर भातावर लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तयार भात खाण्यासाठी सर्व्ह करा. 

लिंबू आणि कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest