कढईत थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कांदा परता.
Picture Credit: Pinterest
त्यात हळद, मीठ आणि मॅश केलेले उकडलेले बटाटे घालून चांगले मिक्स करा. वरून कोथिंबीर घाला आणि मसाला थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
पावचे मधून दोन भाग करा. प्रत्येक पावच्या आतील भागात थोडा बटाट्याचा मसाला भरून हलके दाबा.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात बेसन, मीठ, चिमूटभर सोडा आणि पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
भरलेला पाव उलटा करून (कट केलेली बाजू खाली येईल अशा प्रकारे) बेसनच्या पिठात पूर्ण बुडवा.
Picture Credit: Pinterest
गरम तेलात हे पाव सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम उलटा वडा पाव लसूण चटणी आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest