भिजवलेली मुगाची डाळ पाणी काढून घ्या आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटा. फार बारीक पेस्ट करू नका.
Picture Credit: Pinterest
वाटलेल्या डाळीत हिरवी मिरची, आले, जिरे घालून पुन्हा थोडेसे फिरवा.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणात मीठ, हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल मध्यम गरम असावे.
Picture Credit: Pinterest
हाताने किंवा चमच्याने छोटे गोळे करून गरम तेलात सावकाश सोडा.
Picture Credit: Pinterest
भजी मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
तळलेले पकोडे कागदावर काढून जास्त तेल शोषून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest