एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. 10-15 मिनिटे झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, कांदा, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करा आणि प्रत्येक गोळा थोडा लाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
लाटलेल्या पोळीत पनीरचे मिश्रण भरून कडा नीट बंद करा आणि पुन्हा हलक्या हाताने लाटा.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून त्यावर पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी बटर/तूप लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
Picture Credit: Pinterest
भाजलेल्या पराठ्यावर थोडे बटर लावून वरून थोडी कोथिंबीर शिंपडा, त्यामुळे ढाब्यासारखी चव येते.
Picture Credit: Pinterest
गरमागरम पनीर पराठा दही, लोणचं किंवा बटरसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest