एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि साखर घालून चांगले मिसळा. हे मिश्रण 10–15 मिनिटे झाकून ठेवा जेणेकरून रवा मऊ होईल.
Picture Credit: Pinterest
आता त्यात तेल किंवा वितळलेले बटर घालून पुन्हा एकदा नीट मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स घालून हलक्या हाताने एकसारखे मिश्रण तयार करा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर थोडे दूध घालून केकसारखे स्मूथ बॅटर तयार करा.
Picture Credit: Pinterest
केक टिनला थोडे तेल लावून ग्रीस करा आणि त्यात तयार बॅटर ओता. वरून काजू-बदाम घाला.
Picture Credit: Pinterest
प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 180°C वर 30–35 मिनिटे बेक करा. (कुकरमध्ये करत असाल तर 30 मिनिटे झाकून शिजवा.)
Picture Credit: Pinterest
केक शिजला की थंड होऊ द्या, नंतर तुकडे करून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest