घरच्या घरी बनवा कुरकुरीत साबुदाणा पापड

Life style

22 August 2026

Author:  नुपूर भगत

साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यात साधारण साबुदाणा बुडेल एवढेच पाणी घाला. तो ६ ते ८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.

साबुदाणा भिजवा

Picture Credit: Pinterest

भिजलेला साबुदाणा कढईत घेऊन आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि मंद आचेवर शिजवा. साबुदाणा पारदर्शक-मऊ झाला की गॅस बंद करा.

साबुदाणा शिजवा

Picture Credit: Pinterest

उकडलेले बटाटे मॅश करून त्यात शिजवलेला साबुदाणा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ आणि लिंबाचा रस घाला.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

प्लास्टिक शीट किंवा स्वच्छ कापडावर थोडे तेल लावून मिश्रणाचे छोटे गोळे ठेवा. हाताने दाबून पातळ, गोल आकाराचे पापड तयार करा.

पापड तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार पापड कडक उन्हात ठेवा. एका बाजूने पूर्ण वाळल्यानंतर ते अलगद उलटून दुसरी बाजूही चांगली वाळू द्या. 

उन्हात वाळवा

Picture Credit: Pinterest

पूर्ण वाळलेले पापड हवाबंद डब्यात साठवा. गरजेनुसार गरम तेलात तळून किंवा भाजून कुरकुरीत साबुदाणा पापड सर्व्ह करा.

साठवून ठेवा आणि तळा

Picture Credit: Pinterest