नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कोथिंबीर वडी

Life style

20 August 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, लाल तिखट, हळद, धणे-जिरेपूड, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घाला.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

त्यात चिंचेचा कोळ घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करा. आवश्यकतेनुसार थोडे-थोडे पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा.

चिंचेचा कोळ

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रणाला तेलाचा हात लावलेल्या ताटात किंवा इडली पात्रात रोल करून समान जाडीने पसरवा.

मिश्रण पसरवा 

Picture Credit: Pinterest

कढईत पाणी गरम करून त्यावर जाळी ठेवावी. मिश्रणाचे ताट ठेवून झाकण लावून साधारण १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.

वाफवून घ्या 

Picture Credit: Pinterest

वडी शिजल्यानंतर ती पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर सुरीने चौकोनी किंवा आवडीनुसार आकारात कापून घ्या.

सुरीने तुकडे करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून वड्या मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

वड्या कुरकुरीत तळा

Picture Credit: Pinterest

गरमागरम कोथिंबीर वडी चटणी, दही किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest