Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
केसर लस्सी उन्हाळयातील एक लोकप्रिय पेय आहे जे तुम्ही घरीही तयार करू शकता
१ कप थंड दही, २-३ टेबलस्पून साखर, ४-५ केसर काड्या, २ टेबलस्पून कोमट दूध, वेलदोडा पूड आणि थोडे बर्फाचे तुकडे
४-५ केसर काड्या २ टेबलस्पून कोमट दूधात १० मिनिटांसाठी पाण्यात भिजवा
आता मिक्सरमध्ये थंड दही, भिजवलेले केसराचे दूध, वेलदोडा पूड आणि साखर घाला
सर्व साहित्य छान गुळगुळीत आणि फेसाळ होत नाही तोपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्या
तयार लस्सी एका ग्लासात काढा आणि यात बर्फाचे तुकडे टाका
तयार लस्सीवर ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि काही केसर काड्या घालून सजवा आणि पिण्यासाठी सर्व्ह करा