कुरकुरीत सिंधी कोकी – प्रवासासाठीही उत्तम पर्याय

Life style

18 April 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट आणि मीठ घाला.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

पीठात तूप किंवा तेल घालून सगळे साहित्य चांगले एकत्र करा.

तूप/तेल मिसळा

Picture Credit: Pinterest

थोडे थोडे पाणी घालत घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ साध्या पोळीपेक्षा थोडे कडक असावे.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

मळलेले पीठ 10-15 मिनिटे झाकून ठेवा. नंतर छोटे छोटे गोळे तयार करा.

गोळे तयार करा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक गोळा जाडसर पोळीप्रमाणे लाटा. त्यावर काट्याने किंवा सुरीने छोटे छिद्र करा.

कोकी लाटा

Picture Credit: Pinterest

तवा गरम करून त्यावर कोकी ठेवा. दोन्ही बाजूंनी तूप/तेल लावून मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.

 कोकी भाजा

Picture Credit: Pinterest

गरमागरम सिंधी कोकी दही, लोणचे किंवा बटरसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest