Published Jan 23, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पदार्थ शोधत असाल तर बाजरीचा थेपला तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे आहे
1/2 बाजरीचे पीठ, 1/2 गव्हाचे पीठ, कसुरी मेथी, मीठ, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, लाल तिखट, हळद, ओवा, दही
यासाठी प्रथम बाजरीचे आणि गव्हाचे पीठ एकत्र करा
आता पिठामध्ये धने-जिरे पावडर, लाल तिखट, हळद, ओवा, मीठ घालून सर्व नीट मिक्स करा
आता यात आलं-लसूण पेस्ट, कसुरी मेथी आणि दही घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या
पिठाचा एक गोळा घ्या आणि सुती कापड अथवा प्लास्टिक कागदावर ठेपला छान लाटून घ्या
आता तव्यावर तयार थेपला टाका आणि याच्या दोन्ही बाजूंना तेल लावून छान खरपूस भाजून घ्या
तयार थेपला दही अथवा लोणच्यासह खाण्यासाठी सर्व्ह करा