भिजवलेली उडीद डाळ स्वच्छ धुऊन हिरवी मिरची, आले आणि थोडे मीठ घालून घट्ट व गुळगुळीत वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण एका भांड्यात काढून 5-7 मिनिटे चांगले फेटा. त्यामुळे वडे हलके आणि मऊ होतात.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करा. हाताला थोडे पाणी लावून मिश्रणाचे छोटे वडे तयार करा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
तळलेले वडे कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजवा. नंतर हलक्या हाताने दाबून अतिरिक्त पाणी काढून टाका.
Picture Credit: Pinterest
दही चांगले फेटून त्यात थोडे मीठ घाला. दही खूप घट्ट असल्यास थोडे पाणी घालून एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
भिजवलेले वडे सर्व्हिंग डिशमध्ये ठेवा आणि त्यावर भरपूर दही ओता.
Picture Credit: Pinterest
वरून चिंच-खजूर चटणी, जिरेपूड, लाल तिखट आणि कोथिंबीर भुरभुरा. थंडगार दही वडा सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest