झणझणीत मसाल्यातील भरली भेंडीची खास रेसिपी

Life style

29 May 2026

Author:  नुपूर भगत

भेंडी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. प्रत्येक भेंडीला मधोमध चिर द्या, पण ती पूर्ण कापू नका.

भेंडी मधोमध चिरा 

Picture Credit: Pinterest

एका बाऊलमध्ये शेंगदाणे कूट, सुके खोबरे, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गोडा मसाला, गरम मसाला आणि मीठ एकत्र मिसळा.

मसाला तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार मसाला प्रत्येक भेंडीमध्ये हलक्या हाताने भरून घ्या.

मसाला भेंडीत भरा 

Picture Credit: Pinterest

कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घाला. फोडणी तडतडली की गॅस मंद करा.

फोडणी द्या

Picture Credit: Pinterest

भरलेली भेंडी सावकाश कढईमध्ये ठेवा. झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

 मंद आकार शिजू द्या

Picture Credit: Pinterest

मध्येच हलक्या हाताने भेंडी उलटवा, जेणेकरून सर्व बाजूंनी समान शिजेल. भेंडी मऊ आणि हलकी कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

भेंडीला शिजवा 

Picture Credit: Pinterest

वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम भरली भेंडी पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest