वजन कमी करायचंय? ट्राय करा पौष्टिक ओट्स इडली

Life style

28 May 2026

Author:  नुपूर भगत

ओट्स हलक्या आचेवर 2 ते 3 मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.

ओट्स भाजून घ्या

Picture Credit: Pinterest

एका मोठ्या भांड्यात ओट्स पावडर, रवा आणि दही एकत्र मिक्स करा. त्यात थोडं पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करा.

दही मिक्स करा

Picture Credit: Pinterest

एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी तयार करा.

फोडणी तयार करा 

Picture Credit: Pinterest

ही फोडणी आणि किसलेले गाजर इडलीच्या पिठात घाला. चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण नीट एकत्र करा.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे रवा आणि ओट्स चांगले मऊ होतात.

पीठ झाकून ठेवा 

Picture Credit: Pinterest

इडली बनवण्याआधी पिठात बेकिंग सोडा घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा.

बेकिंग सोडा

Picture Credit: Pinterest

इडलीच्या साच्यांना तेल लावून त्यात पीठ भरा. वाफेवर 10 ते 12 मिनिटे इडल्या शिजवा. गरमागरम ओट्स इडली चटणीसोबत सर्व्ह करा.

इडल्या वाफवा 

Picture Credit: Pinterest