भाकरीसोबत भन्नाट लागतील भरलेली कारली; सोपी रेसिपी

Life style

16 August 2026

Author:  नुपूर भगत

कारल्यांची देठे कापून त्यांना मधोमध चीर द्या. आतील बिया काढून कारली स्वच्छ धुवून घ्या.

कारली धुवा

Picture Credit: Pinterest

कडवटपणा कमी करण्यासाठी त्यांना थोडे मीठ लावून 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवा. पाणी निघाले की मग त्यांना हलक पिळून घ्या. 

मीठ लावून ठेवा

Picture Credit: Pinterest

भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे, लाल तिखट, धणे-जिरे पूड, हळद, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ एकत्र करून भरावणाचे मिश्रण तयार करा.

स्टाफिंग तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार केलेली स्टाफिंग प्रत्येक कारल्यामध्ये व्यवस्थित भरा. गॅसवर तवा ठेवून त्यात तेल गरम करा.

स्टाफिंग भरा

Picture Credit: Pinterest

आता भरलेली कारली कढईत अलगद ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनिटे शिजू द्या, जेणेकरून कारली आतूनही मऊ होतील.

कारली शिजवा 

Picture Credit: Pinterest

कारली अधूनमधून सावधपणे उलटवत राहा. कारली मऊ आणि बाहेरून हलकी खरपूस झाली की गॅस बंद करा.

गॅस बंद करा

Picture Credit: Pinterest

गरमागरम भरलेली कारली भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest