साबुदाणा चाळून घ्या आणि उन्हात किंवा सावलीत 3–4 तास वाळवून घ्या, जेणेकरून तो कोरडा होईल.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर थोड्या-थोड्या प्रमाणात साबुदाणा तळून घ्या. तो चांगला फुलला की बाहेर काढा.
Picture Credit: Pinterest
त्याच तेलात शेंगदाणे सोनेरी होईपर्यंत तळा. नंतर खोबऱ्याचे कापही हलकेसे तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
वेगळ्या कढईत 2 टेबलस्पून तेल घ्या. त्यात जिरे टाका आणि तडतडू द्या.
Picture Credit: Pinterest
आता हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून हलके परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
तळलेला साबुदाणा, शेंगदाणे आणि खोबरे या फोडणीत घाला. मीठ आणि साखर घालून सगळे नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करा आणि चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा
Picture Credit: Pinterest