एग टार्ट बनवण्याची साधी, सोपी रेसिपी

Life style

15 January 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, बटर आणि चिमूटभर मीठ घेऊन नीट मिक्स करा. थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.

पीठ मळा 

Picture Credit: Pinterest

आता मळलेले पीठ 15–20 मिनिटे झाकून ठेवा.

पीठ झाका

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात अंडी फोडा, त्यात साखर घालून चांगले फेटा.

अंडी फेटा

Picture Credit: Pinterest

त्यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकजीव करा.

दूध घाला

Picture Credit: Pinterest

 तयार पीठाचे छोटे गोळे करून टार्ट मोल्डमध्ये पसरवा आणि त्यात अंड्याचे मिश्रण ओता.

मोल्डमध्ये मिश्रण टाका

Picture Credit: Pinterest

आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये 180°C तापमानावर 20–25 मिनिटे बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

 वरून सोनेरी रंग आल्यावर ओव्हनमधून काढा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest