कलिंगडाचे बिया काढून छोटे तुकडे करा. हे तुकडे १ तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
मिक्सरमध्ये थंड कलिंगडाचे तुकडे, लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने घालून गुळगुळीत प्युरी तयार करा.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात फ्रेश क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र फेटून हलके आणि क्रीमी मिश्रण बनवा.
Picture Credit: Pinterest
कलिंगडाची प्युरी क्रीम मिश्रणात घाला. त्यात चिमूटभर मीठ टाकून सर्व मिश्रण नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण एअरटाइट डब्यात भरून फ्रीजरमध्ये ४ ते ५ तासांसाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
२ तासांनी डबा बाहेर काढून मिश्रण चमच्याने हलवा. त्यामुळे आईस्क्रीम अधिक सॉफ्ट आणि क्रीमी बनेल.
Picture Credit: Pinterest
पूर्ण सेट झाल्यावर स्कूप करून आईस्क्रीम सर्व्ह करा. वरून पुदिन्याची पाने किंवा छोटे कलिंगडाचे तुकडे घालून सजवा.
Picture Credit: Pinterest