उन्हाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेमुळे त्वचेतील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे चेहऱ्यावर सतत तेलकटपणा आणि घाम दिसू लागतो.
Picture Credit: Pinterest
दिवसातून २ ते ३ वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ ठेवा. यामुळे अतिरिक्त तेल आणि घाण दूर होते.
Picture Credit: Pinterest
चेहऱ्यावर काही सेकंद बर्फ फिरवल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि घाम कमी येण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात जड क्रीमऐवजी वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे त्वचा चिकट वाटत नाही.
Picture Credit: Pinterest
तेलकट त्वचेसाठी जेल-बेस्ड सनस्क्रीन योग्य ठरते. ते त्वचेला संरक्षण देतानाच अतिरिक्त तेल कमी ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचा फ्रेश दिसते आणि घामामुळे होणारा त्रास कमी होतो.
Picture Credit: Pinterest
जास्त तळकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. फळं, भाज्या आणि ताक यांसारखे पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ केल्याने दिवसभर साचलेली धूळ आणि तेल निघून जाते, ज्यामुळे पिंपल्सचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest