Published Oct 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
चुकीचे खाणेपिणे, व्यायाम न करणे यामुळे अनेकांना कोलेस्ट्रॉलच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यनामंद्र (BAMS) यांच्यानुसार LDL कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक आणि किडनीशी संबंधित आजार होतात
यावर काही ठराविक आयुर्वेदिक उपाय करून घरच्या घरी कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले
.
गरम आणि सहज पचणारे धान्य, डाळी आणि भाज्यांचे सेवन केल्याने कफ दोष संतुलित करता येईल
.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित गरम पाणी प्यावे. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि पचनशक्ती चांगली राहते
नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. दोरीच्या उड्या, चालणे, पोहणे, सायकलिंग असे कोणतेही व्यायाम करावे
कोणत्याही पद्धतीचे तळलेले पदार्थ खाऊ नका. खाल्ल्यास त्रिफळा पावडरचे सेवन करावे
उडीद डाळ, साखरेचे पदार्थ, नट्स बटर, मीट अथवा डेअरी पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशीपोटी व्यायाम करावा, हलके पदार्थ खा जेणेकरून पचनक्रिया चांगली राहील
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही