By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 22 Feb, 2025
आपल्या सर्वांनाच चांगले कपडे परिधान करायला आवडते. पण त्या कपड्यांना डाग लागला तर आपला जीव कासावीस होतो.
आज आपण अशा काही सोप्या ट्रिक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे कपड्यांवरील तेलाचा डाग नाहीसा होईल.
तेलाचा डाग कपड्यावर पडल्यास लगेच गरम पाण्याने डागावर हलकासा स्पंज करा, जेणेकरून तेल सैल होईल.
डागावर डिशवॉशिंग लिक्विड टाका आणि काही मिनिटांसाठी सोडून द्या. त्यानंतर सौम्य ब्रशने चोळून धुवून टाका.
डागावर बेकिंग सोडा पसरवा आणि काही तास ठेवा. यामुळे तेलाचे शोषण होऊन डाग हलका होईल.
लिंबाचा रस डागावर लावा आणि उन्हात वाळू द्या. यामुळे डाग हलकं होऊन निघून जाईल.
डागावर थोडा शॅम्पू लावा आणि चांगले चोळून मग धुवून टाका. विशेषतः हलक्या फॅब्रिकसाठी उपयुक्त.
जर डाग हटत नसेल, तर ड्रायक्लीनिंगसाठी कपडे द्या, जिथे योग्य पद्धतीने डाग काढले जातील.