ब्रेड खाऊन उरल्यावर प्रत्येक माणूस सहजपणाने तो खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो
Picture Credit: iStock
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने जास्त काळ टिकतो आणि बाहेर राहिल्यास मुंग्या वगैरे लागण्याची भीती राहत नाही
पण प्रश्न असा आहे की, ब्रेड फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही? तर याचं उत्तर आहे योग्य नाही
फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्याने कडक होतो आणि त्याचा ताजेपणा संपून जातो, पुन्हा खाण्यास योग्य राहात नाही
ब्रेडचा मऊपणा गेल्यामुळे फ्रिजमधून काढलेला ब्रेड हा चविष्ट लागत नाही आणि त्याचा स्वाद निघून जातो
चवीसह फ्रिजमधील ब्रेडचा सुगंधही नाहीसा होतो आणि ब्रेडचा सुगंध फ्रिजमधील इतर पदार्थांना लागतो
तुम्ही एअरटाईट डब्यात ब्रेड घालून तो बाहेरच स्टोअर करू शकता अथवा स्वच्छ कपड्यात गुंडाळून तसेच पाकिट ठेवता येईल
ब्रेड तुम्ही ५-६ दिवसातच खाऊन संपवावा, अन्यथा याला बुरशी लागू शकते आणि खाण्यायोग्य राहत नाही