Published August 13, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
आतापर्यंत तुम्ही एक किंवा दोनवेळा फोल्ड होणारे स्मार्टफोन्स पाहिले असतील
मात्र आता तीन वेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे
.
हा स्मार्टफोन चीनी कंपनी Huawei ने लाँच केला आहे. तीन वेळा फोल्ड होणारा हा जगातील पहिला फोन असल्याचे बोलले जात आहे
या स्मार्टफोनचे नाव Huawei Mate XT Ultimate असे आहे. हा फोन देशांतर्गत बाजारात लाँच करण्यात आला आहे
या फोनचे वजन 300 ग्रॅम आहे. यात शक्तीशाली प्रोसेसर, 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज आहे
हा फोन फोल्ड केल्यावर तो साधारण 6.4 इंचाचा नॉर्मल फोनप्रमाणे दिसतो मात्र याला ओपन करताच 10.2 इंचाची मोठी स्क्रिन तयार होते
यामध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. ज्यात 50 MP प्रायमरी, 12 MP अल्ट्रा वाइड आणि तिसरा 12 MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेराचा समावेश आहे
हा फोन 19,999 चिनी युआन या सुरवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहे
याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 2,83,900 रुपये आहे