इंडिगोने विमान प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. आता प्रवासी थेट इंडिओ प्लॅटफॉर्मवरुन कॅब बुक करु शकतील.
Picture Credit: Pinterest
एअरलाइनने कॅब्स विथ इंडिगो नावाची नवीन सेवा सुरु केली आहे. ज्याद्वारे प्रवाशांना आता कॅब बुकिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
आता विमानतळावरील कॅबची चिंता संपेल.
Picture Credit: Pinterest
इंडिगोची ही नवीन सेवा कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाईल Appsवर उपलब्ध असेल. ग्राहक फ्लाइट बुकिंगच्या वेळी ही सेवा आरक्षित करु शकतात.
Picture Credit: Pinterest
फ्लाइट बुकिंगसोबतच, प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यासाठी किंवा विमानतळावरुन त्यांच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी कॅबचे आरक्षणही करता येईल.
Picture Credit: Pinterest
यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या Appsवर कॅब शोधण्याची गरज भासणार नाही. परिणामी वेळेची आणि पैशांचीही बचत होईल.
\Picture Credit: Pinterest
कॅब्स विथ इंडिगो अंतर्गत कॅब बुकिंगची सुरुवातीची किंमत ४९ रुपये ठेवण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
ठरलेल्या पिक-अप वेळेपूर्वी बुकिंग रद्द केल्यास कोणतेही रद्दीकरण शुल्क आकारले जाणार नाही.
Picture Credit: Pinterest
कंपनीचे म्हणणे आहे की कॅब चालक प्रवाशांसाठी ३० मिनिटे थांबेल, जेणेकरुन प्रवाशांना शेवटच्या क्षणी कोणताही त्रास होऊ नये.
Picture Credit: Pinterest
इंडिगोने या सेवेसाठी विविध कॅब भागीदारांसोबत भागीदारी केली आहे. जी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest