भारतीय बाजापेठेत SUV ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या १० गाड्यांपैकी निम्म्याहून अधिक SUV आहेत.
Picture Credit: Pinterest
ज्या गाड्यांची लांबी ४ मीटरपेक्षा कमी आहे. अशा गाड्यांना अधिक पसंती दिली जाते.
Picture Credit: Pinterest
टाटाच्या सर्वात स्वस्त SUV टाटा पंचबाबत बोलत आहोत. मे महिन्यात, मारुती सुझुकी फ्रँचायझीनंतर ही दुसरी सर्वाधिक विकली जाणारी SUV होती.
Picture Credit: Pinterest
मे महिन्यात एकूण २०,२०८ युनिट्सची विक्री झाली. जी गेल्या वर्षी विक्री झालेल्या १३,१३ युनिट्सपेक्षा ५३.९% जास्त आहे.
Picture Credit: Pinterest
३१ दिवसांत २०,२०८ युनिट्सच्या मासिक विक्रीसह, दररोज सरासरी ६५१ युनिट्स आणि दर तासाला अंदाजे २५ युनिट्सची विक्री होते.
\Picture Credit: Pinterest
पंच ही तिच्या परवडणाऱ्या किमतीसाठी, ५ स्टार सुरक्षा रेटिंगसाठी सेगमेंटमधील अग्रगण्य वैशिष्ट्ये आणि आकर्षक दिसण्यासाठी तसेच टाटाच्या दशकांहून जुन्या विश्वासासाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
टाटा पंच पेट्रोल आणि CNG या दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून पेट्रोल व्हेरियंटची किंमत ५.६५ लाख पासून आणि CNG व्हेरियंटची किंमत ६.७५ लाख पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
त्याच्या १.२ लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिनमधून ८७ बीएचपी आणि १.२ लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनमधून ११८ बीएचपी शक्ती निर्माण होते.
Picture Credit: Pinterest
CNG व्हेरियंटचे इंजिन ७२ बीएचपी आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते. CNG मध्ये शक्ती कमी होणे ही एक सामान्य बाब आहे.
Picture Credit: Pinterest
पंच CNG मध्ये ड्युअल- सिलेंडर तंत्रज्ञान आहे. रेग्युलर व्हेरिएंटमध्ये ३६६ लिटरची बूट स्पेस मिळते. तर CNG व्हेरिएंटमध्ये २१० लिटरची बूट स्पेस मिळते.
Picture Credit: Pinterest
कॅबिनमध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरिफायर, मागील एसी व्हेंट्स, सिंगल पेन सनरुन यांसारखे फीचर्स मिळतात.
Picture Credit: Pinterest
SUV मध्ये ६ एअरबॅग्ज,इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग, ३६० डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Picture Credit: Pinterest