घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट चिकन मंचुरियन

Life style

14 June 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात चिकन, कॉर्नफ्लोअर, मैदा, अंडे, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि मिरीपूड घालून चांगले मिसळा.

मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून चिकनचे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर बाजूला ठेवा.

चिकनचे तुकडे तळा 

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि ढोबळी मिरची परता.

भाज्या परता 

Picture Credit: Pinterest

भाज्या थोड्या मऊ झाल्यावर सोया सॉस, टोमॅटो केचप आणि चिली सॉस घालून एक मिनिट परता.

सॉस घाला

Picture Credit: Pinterest

एका वाटीत 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून स्लरी तयार करा आणि ती पॅनमध्ये घाला.

कॉर्नफ्लोअर स्लरी 

Picture Credit: Pinterest

सॉस घट्ट होऊ लागल्यावर तळलेले चिकन त्यात घाला आणि सर्व मिश्रण नीट एकजीव करा.

मिश्रण एकत्र करा

Picture Credit: Pinterest

2-3 मिनिटे शिजवून गॅस बंद करा. गरमागरम चिकन मंचुरियन फ्राईड राईस किंवा नूडल्ससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest