बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्यात केली चमकदार कामगिरी.

Sports

23 JUNE, 2025

Author:  शुभांगी मेरे

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ५ बळी घेत बुमराहने महान कपिल देव यांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

जसप्रीत बुमराह

Picture Credit: BCCI

इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने २४.४ षटकांत ८३ धावा देत ५ बळी घेतले.

भारत विरुद्ध इंग्लड

बुमराहने परदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये १२ वेळा ५ बळी घेतले आहेत. जसप्रीतने फक्त ३४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.

बुमराहचे विकेट

बुमराहने इंग्लंडच्या भूमीवर ३ वेळा ५ विकेट्स घेतल्या, तो इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला.

बुमराहचा पराक्रम

कपिल देव यांच्या १२ वेळा पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

कपिल देव

कपिल यांचा पराक्रम

कपिल देव यांनी ६६ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता.

झहीर खान

इशांत शर्माने परदेशात ९ वेळा हा पराक्रम केला आहे तर झहीर खानने ८ वेळा हा पराक्रम केला आहे.

रेकाॅर्ड

बुमराहने आतापर्यंत भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ४७ विकेट्स घेतल्या. आतापर्यंत परदेशी भूमीवर त्याने एकूण १६३ विकेट्स घेतल्या.