Written By: Trupti Gaikwad
Source: yandex, Pinterest
सध्या घिबली ट्रेंड जोरदार सुरु आहे.
अशातच आता छत्रपती शंभूराजेंचे देखील घिबली स्टाईल फोटो व्हायरल होत आहे.
ज्वलज्वलनतेजस अशी इतिहासात ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.
रणनिती धुरंधर त्याचबरोबर साहित्यिक म्हणूनही शंभूराजे ज्ञानी होते.
वयाच्या १४ व्या वर्षी राजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला.
अवघ्या 32 व्या वर्षापर्यंत म्हणजेच तब्बल 9 वर्षांच्या कार्यकाळात राजेंचा परकिय आक्रमणांवर वचक होता.
स्वराज्याचं आरमार भक्कम करण्यात देखील शंभूराजेंचा मोलाचा वाटा आहे.
राजांना मराठी संस्कृत, इंग्रजी अशा 14 भाषा ज्ञात होत्या.