Kawasaki ची मोठी एंट्री! एकाच वेळी लॉन्च केल्या 3 ऑफ-रोड बाइक्स

Automobile

29 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ऑफ-रोड चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Kawasaki ने भारतात KLX230, KLX230 S आणि KLX230R S या तीन नवीन ऑफ-रोड बाइक्स सादर केल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रायडर्सचा विचार करून ही रेंज आणण्यात आली आहे.

Picture Credit: Pinterest

KLX230

रस्ता आणि ऑफ-रोड अशा दोन्ही ठिकाणी चालवण्यासाठी ही ड्युअल-स्पोर्ट बाइक तयार करण्यात आली आहे. रोजच्या वापरासह अॅडव्हेंचर रायडिंगसाठीही ती योग्य ठरते. किंमत: ₹2.19 लाख (एक्स-शोरूम)

Picture Credit: Kawasaki

KLX230 S

या व्हेरिएंटमध्ये सीट हाइट कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कमी उंचीच्या रायडर्सनाही बाइक अधिक सहज हाताळता येते. किंमत: ₹2.19 लाख (एक्स-शोरूम)

Picture Credit: Kawasaki

KLX230R S

ही बाइक खास ऑफ-रोड ट्रॅक आणि ट्रेल रायडिंगसाठी तयार करण्यात आली आहे. हलके वजन आणि मजबूत सस्पेन्शनमुळे कठीण रस्त्यांवरही ती चांगली साथ देते. किंमत: ₹1.89 लाख (एक्स-शोरूम)

Picture Credit: Kawasaki

दमदार इंजिन

तिन्ही बाइक्समध्ये 233cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन कमी वेगातही चांगला टॉर्क देत असल्याने ऑफ-रोडिंग अधिक सोपे होते.

Picture Credit: Kawasaki

कोणती बाइक कोणासाठी?

KLX230: रोजचा वापर + वीकेंड ट्रिप्स KLX230 S: कमी उंचीच्या रायडर्ससाठी KLX230R S: प्रोफेशनल ऑफ-रोड आणि ट्रेल रायडिंगसाठी

Picture Credit: Kawasaki

बुकिंग आणि उपलब्धता

या बाइक्ससाठी बुकिंग सुरू झाले असून अधिकृत Kawasaki डीलरशिपवर त्यांची माहिती मिळू शकते. इच्छुक ग्राहक आपल्या जवळच्या शोरूममध्ये चौकशी करू शकतात.

Picture Credit: Kawasaki

खरेदी करावी का?

जर तुम्हाला अडव्हेंचर आणि ऑफ-रोड रायडिंगची आवड असेल, तर Kawasaki ची नवीन KLX रेंज चांगला पर्याय ठरू शकते. तुमच्या गरजेनुसार तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने योग्य मॉडेल निवडणे सोपे होते.

Picture Credit: Pinterest