लूक, फीचर्स, पॉवरमध्ये Fortuner ला टक्कर देणारी दमदार SUV ची धमाकेदार एँट्री होणार आहे.
Img Source: Pinterest
किया भारतीय बाजारपेठेत किया सोरेंटो या गाडीच्या लाँचची तयारी करत आहे.
कंपनीने अलीकडेच नवीन सेल्टोस लाँच केली. याव्यतिरिक्त सिट्रोस ईव्ही, सेल्टोस हायब्रीड आणि सोरेंटो SUV देखील लाँच होण्याची शक्यता आहे.
ही ब्रँडची फ्लॅगशिप SUV असेल. ही कार भारतात चाचणी करताना दिसली असून तिचे बॉडी शेल एका ट्रकवर दिसले होते.
किया सेल्टोस भारतात लाँच झाली तर तिची थेट स्पर्धा फोक्सवॅगन टायरोन आर लाइन, स्कोडा कोडियाक आणि जीप मेरीडियन यांच्याशी होईल.
गाडीच्या किंमतीमुळे त्याची स्पर्धा फॉर्च्युनर आणि एमजी मॅजेस्टरशी होईल. ही कार भारतात सीकेडी स्वरुपात येण्याची शक्यता आहे.
या कारची लांबी ४८१५ मिमी, रुंदी १९०० मिमी, उंची १७०० मिमी असेल आणि तिचा व्हीलबेस २८१५ मिमी असेल. यामध्ये २०-इंची चाके बसवता येऊ शकतात.
या कारला २०८ मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स असेल. ही कार तीन रांगांच्या सीटसह लाँच केली जाऊ शकते आणि अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल.
सोरेंटोमध्ये १२.३ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरुफ, ३६० डिग्री कॅमेरा आणि लेव्हल २ ADAS मिळेल.
ही कार प्लग-इन हायब्रीड व्हर्जनमध्ये येण्याची शक्यता आहे. जी १.६ लिटर पेट्रोल इंजिन आणि १३.८kWh बॅटरीद्वारे समर्थित असेल. पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता.