Published Oct 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Kiss घेणे ठरू शकते आजाराचे कारण?
प्रेमात चुंबन घेणं हे सर्वात सुंदर फिलिंग आहे. पण Kiss करण्याने आजार होऊ शकतो असं म्हटलं तर?
चुंबन घेतल्याने होणाऱ्या आजाराला किसींग डिसीज म्हणतात, Mayo Clinic ने आपल्या अभ्यासात याचं स्पष्टीकरण दिलंय
मेडिकल भाषेत याला इन्फेक्शियस मोनोन्यूक्लियस अथवा ग्लँड्युलर फिव्हर असे म्हटले जाते
.
Kissing Disease हा आजार एबस्टीन बार व्हायरस अर्थात EBV यामुळे पसरतो
.
अमेरिकेतील संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, किसींग डिसीजला ह्युमन हर्पीस 4 असेही म्हणतात
हा आजर लाळेमुळे पसरतो. चुंबन घेताना लाळेतून हा व्हायरस पसरतो असे अभ्यासात सांगितले आहे
EBV व्हायरस हा खोकला, शिंक, ब्लड ट्रान्समिशन, शारीरिक संबंधातूनही एकमेकांना होऊ शकतो
या आजारात ताप, थकवा, डोकंदुखी, मानेला सूज, टॉन्सिल्स सुजणे अशी प्राथमिक लक्षणे दिसतात
अशी लक्षणे दिसू लागल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. अंगावर असे आजार काढू नयेत