कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून त्यात किसलेली गाजरं घाला. मध्यम आचेवर 5–7 मिनिटे परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात दूध घालून गाजरं मऊ होईपर्यंत शिजवा. दूध पूर्णपणे आटेपर्यंत ढवळत रहा.
Picture Credit: Pinterest
गाजरं नीट शिजल्यावर त्यात साखर घाला. साखर घातल्यानंतर मिश्रण सैल होईल.
Picture Credit: Pinterest
मिश्रण सतत ढवळत राहा आणि साखर पूर्ण विरघळून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात खवा आणि उरलेले तूप घालून चांगले मिसळा. मिश्रण कढई सोडू लागेपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
वेलची पूड आणि चिरलेले काजू-बदाम घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
तुप लावलेल्या थाळीत मिश्रण पसरवा. वरून सुकामेवा पसरून थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापा.
Picture Credit: Pinterest