By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 8 Feb, 2025
संध्याकाळी अनेकांना नाश्त्यात कुरकुरीत भजी खायला फार आवडतात
तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरी मेथीची पौष्टिक भजी देखील बनवू शकता
1 वाटी बेसन पीठ, एक वाटी मेथी, एक चमचा जिरेपूड, पाव चमचा मिरची पूड, पाव चमचा गरम मसाला, खाण्याचा सोडा, मीठ, तेल, हळद इ.
यासाठी प्रथम सर्व साहित्य नीट एकत्र करा
आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भजींसाठीचे पीठ तयार करा
आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका
तयार पिठाचे भजी तेलात सोडा आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत तळून घ्या
गरमा गरम भाजी सॉस अथवा चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा