घरी सोप्या पद्धतीने बनवा हेल्दी आणि टेस्टी मोमोज

Life style

8 January 2026

Author:  नुपूर भगत

मैदा, मीठ आणि पाणी एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या. झाकून 15–20 मिनिटे बाजूला ठेवा.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

सोयाबीन 8–10 तास भिजवून उकडून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

सोयाबीन मिक्सरमध्ये वाटा 

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यात कांदा घालून थोडा परतावा.

कांदा परता 

Picture Credit: Pinterest

आता त्यात कोबी आणि सोयाबीन घालून 2–3 मिनिटे शिजवा. सोया सॉस, मिरी पावडर ,मीठ घालून नीट मिसळा आणि गॅस बंद करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

मळलेल्या पिठाच्या लहान गोळ्या करून पातळ पुरीसारखे लाटा.

गोळा लाटा 

Picture Credit: Pinterest

प्रत्येक पुरीत 1 चमचा स्टफिंग ठेवा आणि मोमोजच्या आकारात कडा घडी घालून बंद करा.

स्टाफिंग भरा 

Picture Credit: Pinterest

स्टीमरमध्ये मोमोज 10–12 मिनिटे वाफवून घ्या किंवा गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या.

उकडा किंवा तळा 

Picture Credit: Pinterest