Published Dec 29, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
पालक आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जाते आहे
तुम्हाला पालकची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट चिला तयार करु शकता
पालक, बेसन पीठ, आले-लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पावडर, हिंग, मीठ, तेल
यासाठी प्रथम पालक धूवून, मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या
मग यात बेसन पीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करा
आता यात इतर सर्व साहित्य एकत्र करा
तव्यावर तेल पसरवून यावर तयार मिश्रणाचा चिला तयार करुन घ्या
चिला मंद आचेवर दोन्ही बाजूंनी छान भाजा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा