Published On 6 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
थालीपीठ हा सर्वांच्या आवडीचा नाश्ता, हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे
भाजणीशिवाय झटपट चविष्ट असे थालीपीठ कसे तयार करायचे ते जाणून घेऊया
यानंतर ज्वारी, गव्हाचे पीठ आणि बेसनपीठ एकत्र करा
आता यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, मिरची पेस्ट, पांढरे तीळ घाला
आता यात तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
कॉटनचा रुमाल पाण्यात बुडवून त्यावर थालीपीठ थापून घ्या
थालीपिठाला काही छिद्र पाडा जेणेकरून ते चांगले शिजले जाईल
तव्यावर तेल पसरवून यावर थालीपीठ टाका आणि खंमग भाजून घ्या
तयार थालीपीठ दही किंवा ठेच्यासह खाण्यासाठी सर्व्ह करा