Published August 16, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
2 कप बेसण, 1 कप चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो, 2 चिरलेल्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या
1/2 चमचा हळद, 1/2 जीरा, 1/2 चमचा बेकींग सोडा, 1/2 चमचा इनो, तेल, मीठ
.
सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यात पाणी घाला आणि घट्ट मिश्रण तयार करा
यानंतर यात कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, मीठ, हळद, जीरे आणि बेकींग सोडा घालून सर्व साहित्य नीट मिक्स करा
आता हे तयार बेसणाचे मिश्रण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या
यानंतर आप्प्यांचा साचा घ्या आणि त्यावर तेल लावून गॅसवर ठेवून द्या
साचा गरम झाला की, यात तयार आप्प्यांचे सारण टाका आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर यांना नीट शिजू द्या
काही मिनिटांनी आप्प्यांनी पलटा आणि दोन्ही बाजूंनी हे आप्पे छान खरपूस भाजूण घ्या
तयार आप्पे एका प्लेटीमध्ये काढा आणि नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा