Published Jan 20, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जर्नल ऑफ इंटरनॅशनल मेडिसिनने केलेल्या अभ्यासात नाश्ता न केल्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो असे सांगण्यात आले आहे
ज्या व्यक्ती सकाळी नाश्ता करत नाहीत, त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका वाढतो. हा अभ्यास 63,000 लोकांवर करण्यात आलाय
अभ्यासात सांगितल्यानुसार आठवड्यातून ज्या व्यक्ती १-२ वेळा नाश्ता करतात त्यांच्यामध्ये लिव्हर-पोटाचा कॅन्सर होऊ शकतो
याशिवाय नाश्ता न केल्याने कोलोरेक्टल कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर आणि ग्रासनली कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात
सकाळी शरीराचे मेटाबॉलिजम मंद असते त्यामुळे लवकर नाश्ता न केल्यास दिवसभर कमी एनर्जी राहते आणि थकवा येतो
नाश्ता सोडल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता येते ज्यामुळे मायग्रेन आणि कमकुवतपणा येतो
सकाळी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरातील लठ्ठपणा वाढू शकतो कारण मेटाबॉलिजम संथ होते
नाश्ता सोडल्यास ब्लड प्रेशर वाढून डायबिटीसचा धोकाही तुम्हाला होऊ शकतो
सकाळी ७ ते १० या वेळात नाश्ता करणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही