Published Jan 23, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Instagram
बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्रालयातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना 10 दिवस लॉकडाऊनप्रमाणे बंदिस्त राहावे लागते
केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी 10 दिवस आधी कर्मचारी आणि अधिकारी यांना कोणाशीही बोलता येत नाही
बजेट तयार करण्याच्या आधी 10 दिवस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 14,400 मिनिट्स एका बंदिस्त ठिकाणी रहावे लागते
अगदी आजारी पडल्यासदेखील रूग्णालयात दाखल करण्याचीही यावेळी अनुमती नाही, डॉक्टरही त्यांच्या आसपासच असतात
बजेटसंदर्भात कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती ‘लीक’ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते
बजेटच्या कागदपत्रांची छपाई पहिले राष्ट्रपती भवनातील प्रेसमध्ये करण्यात येत होती आता ही छपाई मिंटो रोड सरकारी प्रेसमध्ये होते
कर्मचारी आणि अधिकारी यांचा 10 दिवस आधीपासून संपूर्ण जगाशी संबंध तोडण्यात येतो आणि त्यांना कोणालाही भेटण्याची वा बोलण्याची अनुमती नाही