वाढत्या इंधन दरांमुळे लोकांच्या खिशावर ताण आला आहे. त्यामुळे आज आम्ही उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखल्या जाणाऱ्या गाड्यांची यादी घेऊन आलो आहोत.
Img Source: Pinterest
या गाड्यांची किंमत फक्त ३.५० लाख रुपयांपासून सुरु होते आणि लहान कुटुंबांसाठी हा एक उत्तम पर्याय.
मारुती सेलेरिओमध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल व्हेरियंट २५ किमी प्रति लिटर मायलेज देते आणि सीएनजी व्हेरियंट ३४ किमी पर्यंत मायलेज देते.
टियागोमध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल मॉडेल १९ कमी प्रति लिटर मायलेज देते, तर सीएनजी आवृत्ती सुमारे २८ किमी मायलेज देते.
क्विडमध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन आहे. ही गाडी २१-२२ किमी मायलेज देते. तिचा एसयूव्ही लूक विशेष लोकप्रिय असून त्याची किंमत ४.३० लाख आहे.
मारुती अल्टोमध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल मॉडेल २४-२५ किमी प्रति लिटर मायलेज देते आणि सीएनजी मॉडेल ३३-३४ किमी प्रति किलो मायलेज देते.
मारुती एस-प्रेसोमध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल व्हेरियंट २४ कमी प्रति लिटर मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंट ३२ किमी पर्यंत मायलेज देते.
येथे दिलेल्या किंमती एक्स-शोरुम आहेत. मायलेजचे आकडे मिडिया रिपोर्ट्सवर आधारित असून प्रत्यक्ष परिस्थितीत त्यात फरक असू शकतो.