Published Feb 12, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
महाशिवरात्री हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे. असे मानले दाते की, या दिवशी देवांचा देव महादेवाचा विवाह माता पार्वतींशी झाला होता.
शिवविवाहाव्यतिरिक्त असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रकट झाले होते.
वैदिक पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री हा सण बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी पूजेमध्ये काही खास गोष्टींचा समावेश केल्यास यशाचे दरवाजे उघडतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचे ध्यान करताना माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे, यामुळे धनाची प्राप्ती होते.
महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात बुध शिवलिंगाची स्थापना करू शकता आणि दररोज त्याची पूजा करू शकता.
महाशिवरात्रीच्या दिवशी पिठापासून 11 शिवलिंगे बनवून त्यांच्यावर 11 वेळा जलाभिषेक करावा. असे मानले जाते की, या उपायाने मूल होण्याची शक्यता असते.
मन शांत राहिल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्रांचा जप करा