प्रत्येक घासात तिखट, खमंग आणि झणझणीत स्वाद

Life style

30 April 2026

Author:  नुपूर भगत

चिकन स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी निथळू द्या. त्यात हळद, मीठ आणि थोडं लाल तिखट लावून 20-30 मिनिटं मॅरिनेट करा.

चिकन मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर बाजूला काढून ठेवा.

चिकन तळा 

Picture Credit: Pinterest

त्याच तेलात मोहरी घाला. ती तडतडली की कढीपत्ता आणि आले-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परता.

आले लसूण पेस्ट

Picture Credit: Pinterest

आता त्यात लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला घालून मंद आचेवर नीट मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

तळलेले चिकन परत कढईत घालून मसाल्यासोबत चांगले कोट करा.

चिकन मसाल्यात कोट करा

Picture Credit: Pinterest

व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण हलक्या आचेवर 5-7 मिनिटं शिजवा, जेणेकरून मसाला चिकनमध्ये मुरेल.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ द्या. नंतर स्वच्छ, कोरड्या बरणीत भरून ठेवा.

बरणीत साठवा

Picture Credit: Pinterest